Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)

अहिर सुवर्णकार मंडळ, शहादा जि. नंदुरबार आपले हार्दिक स्वागत करीत आहे

संत नरहरी महाराज - आरती

(चाल – जय जगदीश हरे)

जय नरहरी देवा , ओम शिव नरहरी देवा

प्रसन्न होशी दयाळा , कवेत घेई कृपाळा

ऐकून हा धावा ii ओम जय नरहरी देवा ii धृii

तू शिवभक्त अलौकिक , सांबकृपाधारी i

नरहर सांब कृपा धारी i

हर हर शिव हर गर्जे, मल्लिकार्जुन संगे

पंढरपूर द्वारी i ओम जय नरहरी देवा ii १ii

विक्कुटी बांधे दोरा , बांधुनी नयनाला i

नरहर बांधुन नयनाला i

विठ्ठल होई महाशिव , पांडुरंग सदाशिव i

द्वैत भाव शमला ii ओम जय नरहरी देवा ii २ii

नाम्याचा भंडारा पंढरी , साधू संत येती i

भोजणी साधू संत येती i

हात धरूनी नरहरीचा, अलख निरंजन साचा

शिवशंकर येती I ओम जय नरहरी देवा II ३II

वैश्य वर्ण सोनार नरहरी, देव विश्वकर्मा I

आपुला देव विश्वकर्मा I

सुवर्ण रत्न उपासक, मल्लिकार्जुन व्यापक I

पाळशी शिव धर्मा II ओम जय नरहरी देवा II ४II

ज्ञानध्यान सन्मान आम्हा दे, आरती तुझी करितो I

नरहरी आरती तुझी करितो I

एक जीवाचे होऊन, एक शिवाचे होऊन I

माणुसकी स्मरतो II ओम जय नरहरी देवा II ५II

नरहराची आरती, जो कोणी गाई I

संतती सुख संपत्ती, आयू धन उन्नती I

मोक्ष मिळे त्यास II ओम जय नरहरी देवा II ६II

सर्वांना करी एक नरहरी, हा धावा पायी I

बाळ करी हा धावा पायी I

जीवनाचे कर सोने, अध्यात्माचे नाणे I

चरणी तुझ्या वाहू I ओम जय नरहरी देवा II ७II

 

Photo Gallery

कुलदैवत

विंदयावासीनी
देवी
म्हाळसा
देवी
धंनाई पुनाई
देवी

Contact Us

अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा जि. नंदुरबार 425409 महाराष्ट्र

पत्ता : पोस्ट ऑफिस समोर , शहा दा
मोबाइल नंबर : +9423493101

Others: 02565 223106
E-mail: mitshahada@gmail.com