Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)

अहिर सुवर्णकार मंडळ, शहादा जि. नंदुरबार आपले हार्दिक स्वागत करीत आहे

संत नरहरी महाराज

आपापली सामाजिक उन्नती मंडळे स्थापन करताना बहुसंख्य जातीसमुहांना आपापल्या जातीत होऊन गेलेल्या संतांना आपला प्रेरणास्त्रोत माणल्याचे दिसून येते. संत नरहरी सोनार हे सोनार समाजाचे आराध्य संत सतपुरुष संत नरहरिंचा थोडक्यात परिचय घेणे उचित ठरेल.

पंढरपूरात अच्युतपंत व सवित्रिबाई या दाम्पत्याच्या पोटी संत नरहरिंचा जन्म झाला. मल्लिकार्जुनाची भक्ति करणारे शिवपूजक घराने. सर्व देव एकाच ब्रम्हाची रुपे असल्याचे नरहरीना आधी मान्यच नव्हते.

संत नरहरींचा व्यवसाय सोनारकीचा. एकदा देवगिरीच्या (दौलताबाद) एका श्रीमंतास विठ्ठल कृपेने पुत्रप्राप्ती झाली. त्याने विठ्ठलमूर्तीस सोन्याचा कमरपट्टा करायचे ठरविले. मूर्तीच्या कमरेचे माप घेऊन कमरपट्टा बनविण्यासाठी त्याने नरहरीना विनंती केली. पण संस्काराने कट्टर शिवभक्त नरहरी आपणास विठ्ठलाचे दर्शनही नको म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधून विठ्ठलमूर्तीचे माप घेतात. मापानुसार कमरपट्टा तयार केल्यावर पुन्हा डोळ्यांना पट्टी बांधून ते मूर्तीला लावू लागले. पण त्याच्या हाताला व्याघ्रचर्म , त्रिशूल , डमरू आदींचा स्पर्श जाणवला. नाविवजाने डोळे उघडावे लागले. तेव्हा मात्र विठ्ठलच दिसला. असे २-४ वेळा प्रत्ययास आल्यावर त्यांनी विठ्ठलमूर्ति एनआयटी डोळाभरून पाहिली असता विठ्ठालाचा मस्तकी शिवलिंगाचे दर्शन घडले. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. माझाच देव , माझाच गुरु , माझीच भक्ती खरी हा अहंभाव गळून पडला. शिव-विष्णु आदि रुपे वेगवेगळी परंतु परमत्व मात्र एकच असल्याचे ध्यानी आले. मनातला जीव-शिव अर्थात हरी-हर विषयक द्वैत भाव नष्ट होऊन मणी हरी-हर ऐक्य प्रस्थापित झाले. अद्वैत साक्षात्कार झाला. नंतर विठ्ठलाने सदाशिवच पांडुरंग असल्याचे स्वप्नी येवून समजावले. नरहरी विठ्ठलमय झाले. अभंग निर्मिती करू लागले.

आपल्या अभंग रचनेतून नरहरींनी खर्‍या धर्माचे स्वरूप विषाद केले. अवडंबर किंवा कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे. दया , क्षमा , समाधान ही मूल्ये स्वत:मध्ये रुजविणे म्हणजे धर्म. देह ही देवाचीच देणगी असून हा नरदेह पुन्हा लाभणार नसल्याने या जन्मीच भक्तिभावे संत चरणांचे दर्शन घ्या. संत सहवासात जगा हे समजावताना नरहरीनी गुरुकृपेचे अनिवार्यताही स्पष्ट केली आहे.

देवा तुझा मी सोनार ! तुझे नामाचा व्यवहार

हा संत नरहरींचा अभंग मानवी जीवनाकडे पाहण्याची विशाल दृष्टी देतो. आपल्या व्यवसायाचे रूपक बनवून त्यांनी जीवन विषयक तत्वज्ञानाचा मोठा आशय मांडला. ते स्वत:ला देवाचा सोनार मानतात. नामस्मरणाचे अखंडव्रतच त्यांनी अंगिकारले. स्वदेहाला बागेसरी व अंतरात्माच खरे सोने असल्याचे म्हटले . सत्व-रज-तम या त्रिगुणांची मूस करून त्यात ब्रम्हरस (ब्रम्हज्ञान) ओतला. तापवून द्रवरूप केलेले सोने मुशीत ओतूनच त्याचे दागिने अकरता येतात. भट्टीत अंतरात्मारूपी सोने तापविताना नरहरीना जैवा-शिवाने प्राण फुंकले. प्रभूनामाची ही ठोकपीट अव्याहत (रात्रदिन) चालत आहे. सोने शुद्ध करण्यासाठी त्यातील अशुद्ध घटक कडून टाकतात. तसेच अविवेक हेच दु:खाचे कारण असल्याने नरहरीनी सदसदविवेकाचा हातवडा बनवून स्वभावातील काम क्रोधादी दोशांचा चुरा केला. मनाला बर्‍याचदा मौल्यवान वस्तूंच्या चोरीचा मोह होतो. पण मनाला विवेक बुद्धीची कात्री लावून नरहरीनी धातूरूप सोन्याची नव्हे तर रामनामाची अर्थात ईश्वर भक्तीची चोरी केली. रामनाम हेच त्यांना मौल्यवान सोने वाटते. कारण तीच अंत पावेतो टिकणारी व सोबत येणारी दौलत आहे. ज्ञानाचा ताजवा हाती घेवून संसार व परमार्थ या दोन्ही अक्षरांचा अर्थ समजून घेतला. संसाररूपी ओझ्याची पोतडी खांद्यावर वाहताना मुखी हरिनाम असल्याने पैलतीर गाठता आला. हरीचा दास असलेले नरहरी रात्रदिन असे भजनी रमत. सारे जगच त्यांना ब्रम्हरूप वाटू लागले. चरचरात , अणुरेणूत त्यांना पांडुरंग दिसू लागले. माया , भ्रांती , काढून टाकल्याविणा खर्‍या सुखाची प्राप्ती होत नाही. परब्रम्हरूप आनंद अखंड टिकवायचा असल्यास द्वैतभाव , माया , भ्रांती नष्ट व्हायलाच हवी . आपल्या हृदयी अद्वैतभाव बिंबणे ही गुरुकृपा असल्याचे ते मानतात.

संत नरहरींचा काल साडेसातशे वर्षाचा. साडेसात शतके उलटून त्यांचे भक्तीरसपूर्ण साहिती चिरंजीवी आहे व राहील. नरहरी रचित ‘ दुर्गे दुर्गट भारी ’ ही देवाची अजरामर आर्ती भारतभरच्या मंदिरामंदिरात आजही गुंजते आहे. आर्ती मराठीत असूनही हिन्दी चित्रपट सिरियल्सवाल्यांना तिचा मोह आवरता येत नाही. ‘ नरहर तल्लीन झाला ’ या तिच्या अखेरच्या ओळीने समस्त प्रजा संत नरहरींचे नाम मुखी घेत.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या कारकिर्दीत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी होती. त्यात संत नरहरींचेही विशिष्ट स्थान होते. त्यांच्या वैकुंठगमन प्रसंगी संत नामदेवही उपस्थित होते.

“नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी

नरहरी वनमाळी एक झाला”

असे स्वत: नामदेव म्हणतात. संत नरहरींची समाधी पंढरपूरास आहे.

असे अद्वैताचे साक्षात्कारी संत नरहरी सोनार समाजाचा प्रेरणास्त्रोत आहेत. हा समाज संत नरहरींचा नम्र उपासक आहे. मानव तितुका मेळवावा म्हणून द्वैताचा छत्र्या न उभारता बर्‍याच ठिकाणी विविध पोटशाखांचेही सोनार एकत्रितपणे संत नरहरींची जयंती-पुण्यतिथि साजरी करताना दिसून येतात. नेटका प्रपंच करून परमार्थ साधने , नित्यकर्मात पावित्र्य जपणे , प्रभूवर खराखुरा विश्वास टाकला तर तो आपली जबाबदारी घेतो. ही श्रधाशीलता आपल्या पूजनीय सानतकडून सोनार समाजाला लाभलेली भौलिक अशी संस्कार शिदोरी आहे. एकेक माणूस जोडून विधायक अशी संघटनात्मक ऐकयशक्ती उभारणे हे देखील ईश्वरी कार्यच असल्याची भावना या समाजबांधवाच्या मनामनात रूजली आहे. , नवी पिढी ही एकहितवादी स्वकेंद्री असल्याचे म्हटले जात असले तरी विविध सामाजिक , संस्कृतिक उपक्रमात सहभागी होणार्‍या , राबणार्‍या , झटणार्‍या , समाजविकासात आपल्या परीने योगदान देणार्‍या युवांचाही एक मोठ्ठावर्ग सोनार समाजात आहे. सर्वांच्या सहभागाने प्रतिवर्षी श्रावण शु.नवमीस संत शिरोमनी नरहरींचा जन्मोत्सव आणि माघ वद्य तृतीयेस पुण्यतिथि उत्सव जागोजागी साजरा होत असतो.

 

Photo Gallery

कुलदैवत

विंदयावासीनी
देवी
म्हाळसा
देवी
धंनाई पुनाई
देवी

Contact Us

अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा जि. नंदुरबार 425409 महाराष्ट्र

पत्ता : पोस्ट ऑफिस समोर , शहा दा
मोबाइल नंबर : +9423493101

Others: 02565 223106
E-mail: mitshahada@gmail.com