Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)

अहिर सुवर्णकार मंडळ, शहादा जि. नंदुरबार आपले हार्दिक स्वागत करीत आहे

संत नरहरी महाराज - देवा तुझा मी सोनार अभंग

देवा तुझा मी सोनार I

तुझ्या नामाचा वेव्हार II

देह बागेसरी जाणे I

अंतरात्मा नाम सोने II

त्रिगुणाची करुणी मूस I

आत ओतीला ब्रम्हरस II

जीव-शिव करुणी फुंकी I

रात्र दिवस ठोकाठोकी II

विवेक हातोडा घेवून I

काम क्रोध केले चूर्ण II

मन बुद्धीची कातरी I

राम नाम सोने चोरी II

ज्ञान ताजवा घेवून हाती I

दोन्ही अक्षरे जोखिनी II

खांदा वाहूणी पोतडी I

उचले पाऊल पैलथडी II

नरहरी सोनार हरीचा दास I

भजन करी रात्रदिवस II

संत नरहरी महाराज की जय

धन्य ते कुळ पावन तो देश I

जेथे हरीचा दास जन्म घेती II

 

 

Photo Gallery

कुलदैवत

विंदयावासीनी
देवी
म्हाळसा
देवी
धंनाई पुनाई
देवी

Contact Us

अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा जि. नंदुरबार 425409 महाराष्ट्र

पत्ता : पोस्ट ऑफिस समोर , शहा दा
मोबाइल नंबर : +9423493101

Others: 02565 223106
E-mail: mitshahada@gmail.com