Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)

अहिर सुवर्णकार मंडळ, शहादा जि. नंदुरबार आपले हार्दिक स्वागत करीत आहे

नियोजित प्रकल्प

अद्ययावत मंगल कार्यालय आणि गरजू गरीब विद्यार्थ्यांना भरीव शैक्षणिक मदत हे दोन प्रकल्प मंडळांच्या प्राधान्यवर आहेत.

-: नम्र आवाहन :-

‘ अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा ’ हे अश्वगतीने नसले तरी कसवगतीने पण भक्कम पावले टाकत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मंडळाच्या प्रत्येक व्यवहार स्वच्छ व पारदर्शी आहे. मंडळाने ब-हाणपुर-अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गावर शहादा शहरालगत सहा हजार चौरस फुटाचा भूखंड पक्क्या नोंदणीने खरेदी केला असून तो पक्क्या रेव्हेन्यू रेकॉर्डवरही आला आहे. या भूखंडास लागूनच असलेली मोठी खुली जागाही लाभदायी आहे. मंगलकार्यालयाचा नियोजित आराखडाही तयार आहे. सामूहिक ऐक्य व त्याग भावनेनेच हे सुफलीत आहे!

गोपाल श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पेलला , तथापि असंख्य गोपालांच्या काठ्यांचाही त्यास आधार लाभला. सेतु बंधणीत सरीच वानरसेना राबली. कोणत्याही सामूहिक कार्याचा गोवर्धन सुद्धा अशा सामूहिक त्यागाचा आणि सहकार्‍याच्या बळावर पेलला जातो. ‘ गाव करी ते राव काय करी ’ किंवा ‘ दसकी लकडी एक का बोझा ’ या सारख्या म्हणी आपल्या पूर्वजांच्या थोर सामाजिक अनुभवांचे सार आहेत.

संस्थेचे नियमावलीतील नियम १८ नुसार मंडळास देणग्या स्वीकारण्याचा अधिकार असून त्या अन्वये या विधायक उपक्रमासाठी कार्यकारी मंडळ देणगीदात्यांना सढळ हस्ते देणगीकरिता नम्र आवाहन करीत आहे. करदात्या बांधवांसाठी देणगीची रक्कम करमुक्त करण्याचीही सोय केली जाईल. रोखीने किंवा चेकनेही रक्कम स्वीकारता येईल. मंडळाचा सर्व अर्थव्यवहार राष्ट्रीयकृत बँकेद्वारा आहे. देणगी प्राप्त होताच दात्याची नावे व त्यांच्या देणगीची माहिती वेळोवेळी संस्थेच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) जाहीर केली जाईल. किमान पाच हजार किंवा त्याहून अधिकच्या देणगीदात्यांची नावे मंगल कार्यालयाच्या फलकावर रीतसर जाहीर नोंदविली जातील. सर्व मोठ्या देणगीदात्यांची नावे मंगलकार्यालयाच्या विविध कक्षांनाही त्यांच्या इच्छेनुरूप दिली जातील.

संस्थेच्या नियमावलीतील नियम १७ ब अन्वये कार्यकारी मंडळास ट्रस्ट कायदा १९५० व त्याखालील नियमांना अनुसरून संस्थेचे उद्देशपूर्तीसाठी ठेवी स्वीकारण्याचाही अधिकार आहे. संस्थेच्या विधायक कार्यात योगदान म्हणून ज्या दात्यानी बिनव्याजी ठेवी विशिष्ट मुदतीकरिता द्यावयाच्या असतील त्यांचे स्वागत आहे.

तरी सामाजिक बांधिलकी म्हणून या महानिय कार्यात आपले दातृत्व दर्शवून बंधु-भगिनींनी यथाशक्ती योगदान द्यावे असे नम्र आवाहन मंडळ करीत आहे.

अहिर सुवर्णकार मंडळ
शहादा जि.नंदुरबार , महाराष्ट्र

 

Photo Gallery

कुलदैवत

विंदयावासीनी
देवी
म्हाळसा
देवी
धंनाई पुनाई
देवी

Contact Us

अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा जि. नंदुरबार 425409 महाराष्ट्र

पत्ता : पोस्ट ऑफिस समोर , शहा दा
मोबाइल नंबर : +9423493101

Others: 02565 223106
E-mail: mitshahada@gmail.com