Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)

खंडेरावाची तळी

 

एका ताम्हणात तांदूळाचे अष्टदल काढून त्यात भंडार म्हणजे हळद तांब्यात पैसा, सुपारी वर नागलीचे पाने ठेवून नारळ ठेवतात. (पाच नारळाची तळी) भाऊबंदकीतील लोकांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवायचे व येळकोट मल्हार असा जयजयकार करतात. तसेच काही प्रदेशात

सदानंदाचा येळकोट, येळकोट मल्हार येळकोट I

हरहर महादेव I चिंतामण मोरया I भैरोबाचा चांदोबा I

अगडबंब नगारा I सोन्याची जेजूरी I मोत्याचा तुरा I

निळा घोडा I पायी तोडा I कमरी करगोटा I बेंबी हिरा I

गळ्यात कंठी I मोहन माळा I डोईवर शेला I अंगावर शाल I

सदा हिलाल I जेजूरी जाई I शिकार खेळी I म्हाळसा सुंदरी I

आरती करी I देवा ओवाळी I नानापरी I देवाच्या शृंगारा I

कोट लागो शिखरा I खंडेरायाचा खंडका I भंडाराचा भडका I

बोल सदांनंदाचा येळकोट I

म्हणतात. हे म्हणताना हातात दिवटी बुधली असते. विवाहपूर्वी कुलधर्म असेल तर आपले भाऊबंदांनीही त्यांच्या दिवट्या आणवयाच्या असतात व नंतर वरील प्रमाणे जयजयकार करीत जेजूरीच्या दिशेने दिवट्या बुधल्या घेऊन थोडे जायचे असते. (किमान ५ पाऊल) त्या दिशेने खोबरे व भंडारा उधळून जयजयकार करून घरी याचे आणि नंतर नैवेद्य, आरती करून पारणे सोडायचे असते. नारळ फोडून प्रसाद वाटायचा. विवाह निमित्ताने अगोदर किंवा नंतर जेजूरीस जोडप्याने गेल्यावर वाघ्या जेवायला घालणे आवश्यक आहे. किंवा अगोदर घरी मिळाल्यास जेवायला घालावे. इतर वेळा केव्हाही रविवारी तळी भरावी. जेजूरीच्या खंडेरायाची यथासांग अभिषेक, नैवेद्य, वाघ्या जेवायला घालणे, तळी भरणे, दिवट्या पाजळणे, आरती वैगरे पूजा केली असताना तीर्थक्षेत्रात पिंडदान स्थान, दर्शन हे तिन्ही विधी केल्याने होणारे पुण्यफल प्राप्त होते.

हे तात्काळ नवसाला पावणारे कुलदैवत आहे. काही सौम्य नवस करतात तर काही अति कठीण शरीराला क्लेश देणारे असतात. त्यातील खैराचे लाकडाचे रसरशीत निखार्‍यावरून चालणे व पाठीत दोन इंच लोखंडी गळ खोचून त्यास बारा बैलगाड्या बांधून ओढतात. परंतु त्यास काही दुखापत होत नाही. असा हा सर्वांनाच सेवा करण्यास सोपा असा देवाधीदेव महादेवच आहे. परंतु निष्ठावान व प्राणांची बाजी लावून देवाचे रक्षण करणार्‍या भक्तांसाठी परमात्मा धावून येतो याची उदाहरण घडले ते असे औरंगजेबाने जेव्हा हिंदू देवाची मंदिरे फोडली तोडली तिथे कुठेच प्रतिकार झाला नाही पण जेजूरीच्या गडावर पाचशे असे निष्ठावान, प्राणांची बाजी लावणारे निघाले. त्यांनी औरंगजेबाचे सव्वा लाख सैन्याशी प्राणपणाने लढून धारातीर्थ पाडण्याचा निर्धार केला. तेव्हा त्याचा तो खरा निर्धार व पराक्रम पाहून त्या परमात्म्याने सव्वा लाख भुंगे निर्माण करून मागेल सैन्यास पिटाळून लावले. आणि खंडोबारायाचे खरेपण लक्षात येवून औरंगजेबाने पायउतार होऊन, नतमस्तक होऊन सव्वा लाखांचे रत्न अर्पण केले. त्या रत्नास लोक सव्वा लाखांचा भुंगा म्हणतात. तुम्ही रक्षाल देवास देव रक्षीस तुम्हास ते I

 

Photo Gallery

कुलदैवत

विंदयावासीनी
देवी
म्हाळसा
देवी
धंनाई पुनाई
देवी

Contact Us

अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा जि. नंदुरबार 425409 महाराष्ट्र

पत्ता : पोस्ट ऑफिस समोर , शहा दा
मोबाइल नंबर : +9423493101

Others: 02565 223106
E-mail: mitshahada@gmail.com