Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)
घटस्थापना
अश्विन शु. II १ या दिवशी मुहूर्तावर घटस्थापणा करावी. प्रथम जेथे घटस्थापणा करवयाची आहे ती जागा गाईच्या शेणाने सारवून घ्यावी व पूर्ण घरात गाईचे गोमित्र शिंपवून वास्तु पवित्र करून घ्यावी.
प्रथम जमिनीवर थोडे गहू टाकावे. व त्यावर कोरी टोपली ठेवावी. कोर्या टोपलीत काळी माती टाकून त्यात गहू टाकावे व त्यावर मातीचे घट (घागर) ठेवावी. त्यात पानी भरावे. त्यात हळद, कुंकू, अक्षदा व सुट्टे पैसे दक्षिणा टाकून यथासांग पूजा करावी. घटावर नागिणीचे ५ पाने ठेवून त्यावर श्रीफळ ठेवावे. व त्यावर स्वस्तिक काढावी. समोर कुलदेवतेचा फोटो ठेवावा. श्रीगणेशाची व श्रीकृष्णाची मूर्ति देवाची घंटी, समई यांची मांडणी करावी व शेजारी मोठा दगडी किंवा लोखंडी दिवा जो सतत नऊ दिवस पेटत (तेवत) ठेवावा. त्यासाठी तेल वापरावे. घटाला रोज झेंडूच्या फुलांची माळ चढवावी. व संध्याकाळ देवीची आरती करावी धूप दाखवावी.
सातव्या दिवशी फुलोरा लावावा. त्यात गव्हाची बिगर मिठाच्या पापड्या (कडकन्या) सव्वा किलोच्या कराव्या व लकडी चौकटीला सात सात किंवा नऊ नऊ बांधाव्यात, तो फुलोरा घटावर बांधणे व शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून खाणे. फुलोरा आंबाडीच्या दोरीने बांधावा.
आठव्या दिवशी अष्टमीला घट हलविणे. खीर पुरी, गंगाफळाची भाजी याचा नैवेद्य दाखवून घट हलवावे. दसरा किंवा (नवव्या दिवशी दसरा असल्यास देखील) या दिवशी घटाचे विसर्जन नदीत करणे व बाजुचे नारळ फोडून प्रसाद खाणे व वाटणे.
नवरात्र नऊ दिवस कुळातील एका सुनेने दोन्ही वेळा फराळ करून उपवास करावा व चक्रपूजा असेल त्या दिवशी उपवास सोडावावा किंवा अष्टमी घट हलवितो त्या दिवशी एक वेळ उपवास सोडून पुन्हा दसर्याला उपवास सोडवावा. शक्य नसेल तर घट बसतात त्या दिवशी व घट उठतात त्या दिवशी उपवास करावा. याला उठता बसता उपवास असेही म्हणतात. जोडीने उपवास केल्यास लाभदायक ठरते.
![]() |









