Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)
शहादा परिसरातील प्रगतिशील अहिर सोनार :-
सन १९९८ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार या ६ तालुक्यांचा स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यापैकि शहादा हा एक तापी खोर्यातील सातपुडयाचा पायथ्याशी असलेला तालुका या तालुक्यातील खेडदिगर या गावाची सीमा ओलांडताच सुरू होणारा मध्य प्रदेश प्रकाशा पासून ८-१० कि.मी. वर सुरू होणारे (निझर) गुजरात राज्य या सीमा पाहता शहादा या एकाच तालुक्यात महाराष्ट्र , मध्य प्रदेश आणि गुजरात आशा त्रिविध राज्यांचा संस्कृतीचा मिलाफ ध्यानी येतो. इथल्या जिवन शैलीतून आणि भाषा व्यवहारातूनही तो मिलाफ जाणवतो. कृषी , शैक्षणिक व औद्योगिक विकासातून प्राप्त झालेल्या समृद्धीमुळे येथे म.प्र , गुजरात , उ.प्र , राजस्थान , बिहार , केरळ व मद्रास राज्यातील लोकही व्यापार व कारागीर व्यवसायानिमित्ताने येवून कायमचे स्थिरावले. शहादा परिसरात नांदणार्या आशा विविध अंतरराज्य संस्कृतीमुळे हा परिसर खर्या अर्थाने एकात्म भारताचे दर्शन घडवितो. दक्षिणकाशी श्री.क्षेत्र प्रकाशा (केदारेश्वर) पुष्पदंतेश्वर , महानुभाव पंथाच्या एकमुखी दत्ताचे सारंगखेडा , आदि सुप्रसिद्ध तिर्थक्षेत्रांनी पावन झालेली ही भूमी आहे.
खरीप आणि रब्बी अशी दुबार पिके देणारी काळी सुपीक जमीन , विपुल वनसंपदा , सिंचन योजना व सहकार तत्वावरील उद्योगांमुळे आलेल्या समृद्धीने शहादा परिसरातल्या माणसांचे जीवनमान तुलनेने निश्चितच उंचावलेले आहे. अहिर उर्फ अभिर प्रदेश म्हणून पूर्वीपार ओळखल्या जाणार्या खान्देशात अहिरांचे वास्तव्यही स्वाभाविकच पुर्वापार (प्राचीन) आहे. आहीरांच्या अठरापगड जाती खान्देशात प्राचीन काळापासून आपले अस्तित्व टिकवून आहेत. तथापि इथल्या बहुसंख्यांक आणि राजकारणातील प्रस्थापित वर्गांकडेच जमिनीचे व उद्योगांची मालकी राहिल्याने मूठभर अपवाद वगळता इथल्या अहिर जातींकडे लक्षणीय अशी आर्थिक समृद्धी नाही . शहादा परिसरात अहिर जातींमध्ये मोठे जमीनदार अपवादात्मकच आहेत. नोकरी , कारागिरी , दुकानदारी आदि साधनांवर जगणार्या इथल्या बहुसंख्य अहिर जाती माध्यम आर्थिकस्तरातच आहेत. इथला अहिर सोनार समाजही त्यास अपवाद नाही.
असे असले तरी शहादा पंचक्रोशीतल्या अहिर सोनारांमधील शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आणि आपले अस्तित्व शोधू पाहणारी नवी पिढी प्रगतिची नवनवी शिखरे पादकांत करीत असल्याचे समाधानकारक चित्रही अलीकडे दिसू लागले आहे. काही अहिर बांधव पारंपारीक सराफी , प्लॉटींग , हॉटेल-लॉजिंग आदि उद्योगात तर काही किरकोळ दुकानदारी नोकरी , कारागीर आदि व्यवसायात स्थिरावलेले आढळतात. आर्थिक दृष्टीने वेगवेगळे स्तर असले तरी शहादा परिसरातले समस्त अहिर सोनार बांधव आपले आमाजिक ऐक्य टिकवून आहेत. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे आहेत. आपल्या सामाजिक , सांस्कृतिक , विकासार्थ इथल्या अहिर बांधवातील नवसाक्षर पिढी अनेक स्तुत्य उपक्रम राबवण्यासाठीही धडपडत आहेत. ’ अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा ’ या संस्थेचा उदय हा देखील अशा धडपडीचा एक भाग आहे.
‘ अहिर सुवर्णकार मंडळ शहादा ’- वाटचाल:
शहादा परिसरातील अहिर सुवर्णकार बांधवांनी सामाजिक एकय , एकमेकांचे सुख:दुखातही संवेदनशीलता,
सौजन्य आदि बाबींचा वसा-वारसा पूर्वापार जपला आहे. देशसेवा व देशासाठी त्याग करण्याठी इथला अहिर सोनार मागे नाही. कै.रतन पांडुशेठ सोनार , कै.मंगू ताणजीशेठ सोनार , कै.गोपाळ तानाजीशेठ सोनार आदि स्वतंत्र सेनानिंचा या परिसरात एक उज्वल व समाजासाठी अभिमानास्पद इतिहास आहे.
आज लग्न , उत्तरकार्यादी कार्यक्रमासाठी विविध वस्तुरूप साधनांसह आणि मनुष्यबळासह ठेकेदारी सेवा उपलब्ध आहेत. पूर्वी या गोष्टींचा अभाव असताना समाजबांधवच एकमेकांच्या हाती हात घेवून रूसवे-फुगवे विसरून एकमेकांना साथ देत. काही अत्यावश्यक साधंनांचा उणिवा ध्यानी घेवून सामुदायिक वर्गणीतून अनेक समारंभाना लागणार्या वस्तु (भांडी , सतरंज्या आदि) सामूहिक वर्गणीतून उपलब्ध करून घेत. कुणाच्या मरनादी संकटात सर्वांनी धावून जाने , सामूहिक श्रद्धांजलि वाहने ही संवेदनशीलता कायम जपली आहे. प्रत्येकजन समाजासाठी आपापल्या यथाशक्तीने योगदान देत आला. कुणी वेळेचे , कुणी श्रमाचे , तर कुणी कमी अधिक आर्थिक योगदान दिले आहे. व देत आहे.
समाज जीवनात आपले सांस्कृतिक योगदानही असावे म्हणून इथल्या अहिर सोनाए बांधवांनी शहादा , तळोदा , नंदुरबार येथे स्वखर्चाने वगनाट्याचे (हवालदार भोळा , बाईवर डोळा) प्रयोगातही सादर केले. सार्वजनिक गणेशोत्सव , सत्यनारायन पूजा , संत नरहरी जयंती व पुण्यतिथि , उत्सव , भजन , प्रबोधंनात्मक किर्तनादी उपक्रम राबविण्याची परंपरा शहादा तालुक्यातील अहिर सुवर्णकार बांधवांनी कायम जपली आहे. सामूहिक कार्यात भिन्न भिन्न स्वभावाची भिन्न भिन्न विचारसरणीची माणसे एका जागी आल्यावर मतभेद , वादावादी हेणेही स्वाभाविकच असले तरी क्षणिक मतभेदांमुळे कायमचे मतभेद घडून सामाजिक ऐक्याला तडा जाणार नाही याची दक्षता इथला अहिर बांधव नेहमीच घेत आला आहे. त्यामुळेच येथे गटातटाचे राजकारण घडले नाही.
१९९८ मध्ये संस्थेची अधिकृत पद्धतीने आदर्श घटना व संहिता (नियमावली) सिद्ध होऊन धर्मदाय आयुक्तांकडे कायदेशीर नोंदणी झाली. या नोंदणीच्या रूपाने सन १९७५-७६ पासून पाहिलेले दोन तपांचे स्वप्न साकार होऊन मंडळाच्या भक्कम , कायदेशीर , पारदर्शी आणि दिमाखदार अशा वाटचालीचा शुभारंभ झाला.
समाजाचा क्रीडा , सांस्कृतिक , शैक्षणिक विकास करणे , त्याकामी गरजूंना भरीव मदत करणे , वृद्ध- अनाथ-अंध-मुकबधिरांची सेवा , सामाजिक ऐक्यवर्धन गुणवंतांचा गौरव , संत महातम्यांची जयंती-पुण्यतिथि व विविध सणांच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजून वैचारिक प्रबोधन घडविणे , वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे , सुवर्णकलेचे कौशल्य व दर्जा उंचावण्याचा प्रयत्न महिला विकास , आदि उद्दिष्टांसाठी ‘ अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा ’ या संस्थेची दि.३१-०५-१९९८ रोजी स्थापन होऊन तिची संस्था नोंदणी अधिनियम १८६० नुसार धर्मदाय आयुक्तांकडे र.न.४७८१/महाराष्ट्र/दि.१५-०७-१९९८ या क्रमांकाने रीतसर नोंदणी झाली.
संत नरहरी जयंती व पुण्यतिथि साजरी करण्याची नोंदणी पूर्वकाळातील परंपरा मंडळाने अव्याहत सुरू ठेवली आहे. नोंदणीपूर्व (१९९७ मध्ये) ह.भ.प . खगेंद्रजी महाराजांचे प्रबोधनपर कीर्तन आयोजिन्यात आले होते. ती प्रबोधन परंपरा मंडळाने अखंडित ठेवली आहे. (ह.भ.प.चंद्रकांतजी उदावंत-आकाशवाणी कलावंत , वाई जि. सातारा , विविध अभ्यासू वक्त्यांची व्याख्याने , ई.) निबंध-चित्रकला-पाककला-रांगोळी- आदि स्पर्धा , मोफत रक्तगट तपासणी शिबीर , आदि उपक्रमही राबविण्यात येतात.
दरवर्षी सर्वसाधारण सभेत समजतील सेवानिवृत झालेले बांधव , कारागिरादी गुणीजन , माध्यमिक - उच्चमाध्यमिक-विविध पदवी-पदविका-पदव्युत्तर स्तरांवरील यशस्वी विद्यार्थी- विद्यार्थिंनिंचा जाहीर सत्कार करण्यात येतो. देणगीदात्यांचा कृतज्ञापूर्वक उचित सन्मान करणे हे मंडळाने आपले कर्तव्यच मानले असून मान्यवरांच्या हस्ते दात्यांचा शाल-श्रीफळ-गुलाबपुष्प-स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन खास गौरव केला जातो.
ढगफुटी , भूसख्खलन , भूकंप , चक्रीवादळ , आदि राष्ट्रीय आपत्तीत बळी पादणाणरे भारतीय नागरिक , शहीद जवान , निधन झालेले समाजबांधव आदींसाठी सामूहिक श्रद्धांजली वाहून संवेदना व्यक्त करण्याची परंपरा मंडळाने कायम जपली आहे.
संस्थेच्या नियमावलीतील क्र.१७ इ नुसार शहादा सुवर्णकार महिलांच्या संस्कृतिक समृद्धी मंडळाचीही निर्मिती करण्यात आली आहे. कोणतीही निवडणूक पद आणि स्पर्धा असू न देणे हे या मंडळाचे खास वैशिष्ट आणि वेगळेपण आहे. वयाने ज्येष्ठ अशा भगिनी मार्गदर्शिका आहेत. तथापि सर्वानुमते निर्णय घेण्यावरच भर असतो. या मंडळात आयोजिल्या जाणार्या क्रीडा-संस्कृतिक कार्यक्रमातही स्पर्धा नसतात. स्पर्धेतून निर्माण होणारी ईर्ष्या , असूया , मतभेद , व मतभेद टाळणे हीच या मागील भूमिका आहे. दरमहा एकत्र जमणे , काही सणांनाही एकत्र येणे , हळदी-कुंकू , संस्कृतिक कार्यक्रम , सहलींचे आयोजन , आदि बाबीतुन ऐक्यभाव वृद्धिंगत केला जातो.
मंडळाकडून दरवर्षी जनरल सभेत वर्षभरातील जमा-खर्च आणि भावी नियोजनाचा आराखडा मांडला जातो. समाजबांधवानी मांडलेले विधायक विचार प्रस्ताव स्वीकारले जातात. खर्चात काटकसरीचे धोरण कटाक्षाने पाळले गेले आहे. नोंदणीसाठी १९९८ साली झालेली किरकोळ खर्च सोडता समाजाच्या पवित्र गंगाजळी मधून कोणतीही मीटिंग किंवा समारंभासाठी खर्च करण्यात आला नाही. सार्वजनिक खर्चाने समारंभ होतात. एखाद्या दानशूर बांधवाने स्वेच्छेने तयारी दर्शविली तरच समारंभात भोजनावली होतात. हेतूंची शुद्धता स्वच्छ व पारदर्शी व्यवहार यामुळेच मंडळाची कार्यकारिणी , सभासद बंधु-भगिनींमधील ऐक्य आणि प्रेमभाव कायम टिकला आहे.
|










